अखेर अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविले

0

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजारावरून 6 हजार 500 तर मदतनीसांचे मानधन अडीच हजार रूपयांवरून 3हजार 500 रूपये, मीनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 3 हजार 250 रूपयांवरून 4 हजार 500रूपये करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोषण आहार वाटपाचे काम सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, या आधी 2014 -15 मध्ये अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. त्यावेळी शासनाने 289 कोटीं रूपयांची ही मानधनवाढ केली होती. त्यानंतर पुन्हा अंगणवाडी सेविकांना न्याय मिळावा, म्हणून सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अहवालानुसार पुन्हा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. शासन अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे वेळोवेळी संघटनांच्या बैठकीमध्ये सांगण्यात आले.