चिंता करण्याचे कारण नाही: शरद पवार
मुंबई: काल राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते माजी उपमुख्यमंत्री आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. कालपासून ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. आज तब्बल १९ तासानंतर ते शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. त्याठिकाणी पवार कुटुंबियांशी चर्चा झाली. त्यानंतर आता पवार कुटुंबियांची चर्चा संपली असून अजित पवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.
मी राजीनामा का दिला याबाबत ३ किंवा ४ वाजता धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अजित पवारांनी माध्यमांना सांगितले.