नवापूर । शहरातील इंदिरा नगर भागातील नाल्यातील घाण काढुन साफसफाई करण्याचे काम नगर पालिकेकडुन सुरु करण्यात आले आहे. मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी यकडे लक्ष देऊन काम करण्याचा सूचना दिल्या आहेत. राजेंद्र शिंदे यांचा कार्यतत्परतेची प्रचिती पुन्हा पहायला मिळाली. विकास आघाडीने नाल्याची साफसफाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. आज दैनिक जनशक्तीने प्रसिध्द केलेल्या ठळक बातमीने नगर पालिके ने नाला साफ सफाई सुरु केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आरोग्याचा प्रश्न होता गंभीर
इंदिरा नगर भागातील रहिवाशांनी वेळोनेळी याविषयी आवाज उठवला होता. नवापूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले इंदिरा नगर परिसरात नाल्यात पावसाळ्या पूर्वी नगर पालिकेने सुमारे 2 कोटी रु खर्चून संरक्षण भिंतीचे कामे करण्यात आली होती. परंतु संबधित ठेकेदार आणि कामचुकार धोरण असलेली नवापूर नगर पालिकेच्या निष्काळजीपणा मुळे ठेकेदाराने खोदकाम केलेले माती ,दगड, इतर साहित्य नाल्यातच टाकून दिल्याने पाण्याचा प्रवाह सर्वत्र आडल्याने ठीकठिकाणी डबके साचलेले होते. परिसरात दुर्गन्धी व मच्छर डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाल्याने साथीचे आजार दिवसेंदिवस वाढतच होते. विशेष म्हणजे लहान मुलांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न गंभीर झाला होता. याबाबत निवेदन ही देण्यात येऊन आंदोलन करण्याचा इशारा विकास आघाडी व रहिवाशांनी दिल्यावर नगर पालिका जागी झाली आज सकाळ पासुन नाला सफाई काम सुरु करण्यात आले.