अखेर इरफान खान सात महिन्यांच्या उपचारानंतर परततोय भारतात

0

मुंबई : इरफान खानच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा दुर्धर आजार झाल्याचं निदान झालं होतं. त्यासाठी तो जवळपास सात महिने लंडनमध्ये होता. आता सात महिन्याच्या उपचारानंतर तो लवकरच भारतात परतणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून इरफान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या प्रकृतीविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केली आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे तो लवकरच ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. येत्या एक- दोन दिवसांत तो मुंबईत परतणार असून त्यानंतर लगेच शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे इरफानच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं स्पष्ट होतं आहे.