चेन्नई : मणिपूरमधून ‘अफस्पा’ कायद्याविरोधात विक्रमी आंदोलन करणार्या सामाजिक कार्यकर्त्या व मणिपूरच्या आयर्न लेडी’ इरोम शर्मिला या डेस्मंड कुटुन्हो यांच्याशी गुरूवारी तामिळनाडूतल्या कोडईकॅनाल येथे विवाहबद्ध झाल्या.
ब्रिटनचे नागरिक असलेले कुटिन्हो हे शर्मिला यांचे पूर्वीपासूनचे साथीदार आहेत. या दोघांनी नोंदणी पद्धतीच्या विवाहासाठी 12 जुलै रोजी अर्ज भरला होता. कोडाईकॅनलमधील उपनिबंधक कार्यालयात विशेष विवाह कायद्यानुसार साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला. कुटिन्हो यांनी शर्मिला यांच्या बोटात अंगठी घातली. हा विवाह आंतरधर्मीय असल्याने आधी हिंदू विवाह कायद्यानुसार त्यांचा विवाह झाला. नंतर उपनिबंधकांनी विशेष विवाह कायद्यानुसार त्याची नोंदणी करण्यास सांगितले.