अखेर उल्हासनगरचे जनसंपर्क अधिकारी भदाणेच्या निलंबनावर शिक्कामोर्तब

0

उल्हासनगर।उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याच्या भ्रष्टाचाराच्या पापाचा घडा अखेर फुटला. गेल्या आठ दिवसापासुन माजी नगरसेवक दिलीप मालवणकर व विद्यमान नगरसेवक प्रमोद टाले तसेच शहरातील व्यापारी,संस्था चालक, पत्रकार यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत महापालिका आयुक्त गणेश पाटील यानी यूवराज भदाणे याला निलंबित केले आहे. महापालिकेचे उपायुक्त देहेरकर यानी उपोषण स्थळी येवुन भदाणे याला निलंबित केल्याच पत्र देवुन गेले नऊ दिवस सुरु असलेल्या उपोषणाची सांगता केली आहे.

दरम्यान उल्हासनगर शहराच्या आमदार ज्योती कालानी यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करून युवराज भदाणेच्या भ्रष्टाचाराचा कलंकित चेहरा महाराष्ट्रासमोर आणला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस याची तात्काळ गंभीर दखल घेत युवराज भदाणे वर कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहेत. या प्रकरणाने उल्हासनगर महापालिका प्रशासन प्रशासन खडबडून जागे झाले असुन ताबडतोब युवराज भदाणेला निलंबित केले असल्याचा आदेश जाहिर केला . आता या निलंबन प्रकरणाचे श्रेय लाटण्यासाठी शहरात अनेक जणपुढे सरसावले असुन येणार्‍या दिवसात युवराज भदाणे ला आम्हीच कसे निलंबित केले याच्या चुरस कथा शहरातील नागरीकांना ऐकायला मिळणार आहे.