एरंडोल । एरंडोल तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत भारत केसरी कमलजीतसिंगने युरोपच्या झोरो अखोबजारे याचा पराभव करून मानाची कुस्ती जिंकली. कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पहेलवान सहभागी झाल्यामुळे स्पर्धेस क्रीडा प्रेमींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर कुस्ती स्पर्धेचे आखाडा पूजन खासदार ए.टी.पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
लहान मोठ्या गटातील शंभर कुस्त्या
स्पर्धेत सुमारे शंभर लहान व मोठ्या गटातील कुस्त्या लावण्यात आल्या.यामध्ये मुलींच्या दहा लढती घेण्यात आल्या.प्रमुख व अंतिम कुस्ती भारत केसरी कमलजीतसिंग व युरोप येथील पहेलवान झोरो अखोबजारे यांच्यात झाली. सुमारे नऊ मिनिटे दोन्ही पहेलवानांनी एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. अखेर दहाव्या मिनिटाला भारत केसरी कमलजीतसिंगने झोरो अखोबजारे यास पराभूत करून मानाची अंतिम कुस्ती जिंकल्यानंतर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.विजेत्या कमलजीतसिंगला तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले.
खासदार ए.टी.पाटील यांची उपस्थिती
तर नगराध्यक्ष रमेश परदेशी,भाजपाचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर,पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांचे पुत्र साई पाटील या बाल पहेलवानाची कुस्ती खासदार ए.टी.पाटील यांचे हस्ते लाऊन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
अंतिम कुस्तीसाठी पंच म्हणुन गोरख पाटील व सुरेश देशमुख यांनी काम पाहिले.डी.एस.पाटील,प्रकाश चौधरी व दिगंबर बोरसे यांनी धावते समालोचन केले.कुस्तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष संदेश महाजन यांनी प्रास्तविक केले.प्रा.आर.एस.पाटील यांनी आभार मानले.स्पर्धेस भाजपाचे ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक प्रा.मनोज पाटील,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,युवा उद्योजक संजय काबरा,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,माजी नगरसेवक रमेश महाजन,नरेंद्र पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,जहीरोद्दिन शेख कासम,सचिन विसपुते,भाजपाचे शहराध्यक्ष निलेश परदेशी,भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रशांत महाजन आदी उपस्थित होते.