नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जा देणारे कलम ३७० काल रद्द करण्यात आले आहे. या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. आत लोकसभेत हे विधेयक मांडण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षातील नेते या विधेयकाचे स्वागत करत आहेत, तर विरोधक विरोध करीत आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी या विषयावर काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. अखेर राहुल गांधी यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. ट्वीट करत राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. जम्मू-काश्मीरबाबत घेतलेला निर्णय हा एकतर्फी असून तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकले जात आहे हे असंवैधानिक आहे. सरकारने आपली शक्ती वापरून हे केले आहे मात्र याचे राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील असे राहुल गांधीनी म्हटले आहे.