अखेर कृषी सभापतींनी स्विकारला पदभार

0

जळगाव। जिल्हा विषय समित्यांचे वाटप तीन आठवडे पूर्वी झाले. गेल्या दहा ते पंधरावर्षापासून जिल्हा परिषद उपाध्यक्षाकडे असलेले बांधकाम व अर्थ समिती यावेळी काढून घेण्यात आली. उपाध्यक्षाकडे कृषी समिती सभापतीपद देण्यात आले. मात्र नाराजी मुळे सभापती नंदकुमार महाजन यांनी कृषी समितीचा पदाचा पदभार घेण्यास टाळाटाळ केली. अखरे शुक्रवारी 26 रोजी कृषी समितीच्या बैठकीच्या दिवशी त्यांनी समितीचा पदभार घेतला. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकर्यांच्या बियाण्यांसह खताच्या महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय होणे गरजेचे त्यांनी सभेस उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कापसाच्या राशी 659 या वाणाला अधिक मागणी आहे. मात्र शासनाने 659 च्या वाण विक्रीवर स्थगिती दिली असल्याने शेतकर्‍यांचे बियाण्या अभावी हाल होत आहेत. शेतकरी बियाणे खरेदी करत नसल्याने बियाणे बाजाराचा करोडोचा व्यवहार ठप्प झाला आहे.

राशी 659 साठी ठराव
शासनाने या वाणावरील स्थगिती उठवून जिल्ह्यात 659 च्या विक्रीला परवानगी द्यावी असा ठराव शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा उपाध्यक्ष तथा कृषी समितीचे सभापती नंदकुमार महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यासभेत सदस्यांनी कापसाच्या राशी 659 वाणाच्या प्रश्नावर चर्चा केली. शासनाने गेल्या तीन आठवड्यापासून 659 या वाणाला विक्रीसाठी स्थगिती दिली आहे. त्यातच जिल्ह्यात बागायत व खरीप हंगामाच्या पेर्‍यासाठी या वाणाची शेतकर्‍याकडून अधिक मागणी केली जात आहे. मात्र बाजारात हे वाण उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात या वाणाला विक्री करण्यासाठी शासनाला पत्र व्यवहार करून तसा ठराव एकमुखी करण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैकीत करण्यात आला. स्वदेशीचे फक्त 3 हजार 500 पाकीटे जून महिन्यात उपलब्ध होणार आहेत.