मुंबई: निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटले आहे मात्र अद्यापही युतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याने तणाव निर्माण झाले आहे. दरम्यान राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत, यावेळी ते सरकार स्थापनेसाठी भाजप महायुतीला आमंत्रित करण्याबाबत विनंती करणार आहे. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज दुपारी बोलावण्यात आली होती. याबैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
“आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे सरकार आमचेच येणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.