अखेर चर्चेला पूर्णविराम; राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसमध्येच राहणार !

0

अहमदनगर: विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मात्र ते भाजपात प्रवेश करणार नसून कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करणार नसल्याचे खुद्द त्याचे सुपुत्र आणि भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे, त्यामुळे प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

माझे वडिल काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सुजय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वडिल काँग्रेसमध्ये असताना मी भाजपात प्रवेश केलेला आहे. सध्या निवडणूक असून ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे राधाकृष्ण यांनी भाजपात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सुजय यांनी म्हटले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आज मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे आज त्यांच्या भाजपा प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.