अखेर चार दिवसांनंतर उपोषणाची सांगता

0

भुसावळ । शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमधील घोटाळ्यांची चौकशी तसेच यात अडकलेले दलाल व बँकेच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जनता की अदालत संघटनेतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुरुवार 9 रोजीपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. यासंदर्भात प्रांताधिकार्‍यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार उपोषण सोडण्यात आले.

प्रांताधिकार्‍यांशी केली चर्चा
संघटनेतर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली. उपोषणार्थी महादेव बोंडे, कैलास सोनार, विजय भोई, मकबुल शहा यांच्याशी विचारविनिमय झाल्यानंतर मागण्या मंजूर करुन संबंधितांवर कारवाई करण्याबाबतचे आश्‍वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी बाळा सोनवणे, प्रकाश सोनवणे, गिरीश डोलारे, चंद्रकांत सोनवणे, शरद सोनवणे, राजू सोनवणे, सत्यनारायण शुरपाटणे, रितेश भोई, सुनिल भोई, पिंटू भोई, महिला जिल्हाध्यक्षा मुमताज शहा यांनी मध्यस्थी करुन प्रांताधिकार्‍यांशी चर्चा घडवून आणली.