चाळीसगाव । चाळीसगाव शहरासह तालुक्याला विद्युत पुरवठा करणारे 132/11 केव्ही सिटी करंट विद्युत रोहीत्र गुरूवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास फुटून अचानक आग लागल्यामुळे शहरासह तालुक्याचा विद्युत पुरवठा 3 तास खंडीत झाला होता. रात्री काही भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करून शुक्रवारी दुपारपर्यंत सर्व वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहरासह तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचेच झाले असून या प्रकाराकडे लक्ष देऊन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
दुपारपर्यंत दिलासा
हा विद्युत पुरवठा सुरु होण्यासाठी जवळपास अनेक फिडर वरील कर्मचारी कामकाज करीत होते. 6 रोजी या 132/11 केव्ही येथे जो बिघाड झाला होता, तो पूर्णपणे दुरुस्त व्हावा यासाठी उपकार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत 20 ते 25 कर्मचारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कामाला लागले होते. दुपारी 1,30 वाजेपर्यंत त्यांचे कामकाज सुरु होते व 2 वाजेच्या सुमारास सपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र यावेळी एकुण 16 फिडर पैकी टप्या टप्याने खडकी, शहर, सिटीयम डेरीभाग, गणेशपुर, बेलगंगा हे फिडर बंद करण्यात आले होते. या रोहीत्रावर 33 केव्हीवर 9 तर 11 केव्ही 7 फिडर आहेत. अश्या एकुण 16 फिडरवर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी एक एक करत टप्या टप्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती खडकी बुद्रूक शिवारातील कार्यालय असलेल्या विद्युत पारेषण कंपनी मर्यादित 132 केव्ही चाळीसगाव उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता भागवत डोखे यांनी दिली आहे.
अचानक आग
चाळीसगाव तालुक्यालासह शहराला विद्युत पुरवठा करणार्या 132/11 केव्ही टाँसफॉर्मर सिटी करंट विद्युत रोहीत्र गुरूवारी 10 वाजेच्या सुमारास अचानक फुटल्याने रोहीत्राला आग लागली. आग लागताच कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच धावपळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. बराच वेळ शर्थीचे प्रयंत केल्यानंतर नगरपरिषदच्या अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली व जवळपास 3 तासांच्या अथक परीश्रमानंतर तालुका व शहराचा वीजपुरवठा रात्री 1 वाजेच्या सुमारास सुरळीत झाला होता.
वेळेवर दुरूस्ती आवश्यक
एप्रिल महिन्यात उन्हाळ्याचा सर्वात जास्त उकाडा असल्याने यावेळी पंखा. कुलर. एसी. यासारखे उपकरण चालविण्यासाठी जास्त प्रमाणात विजेची आवश्यकता असते मात्र विजेच्या लपंडावामुळे तर 16 फिडर पैकी अचानक पणे कुढलेही फिडर बंद पडते त्यावर अवलंबून असलेला भाग अचानक पणे अधारात येतो व दिवस आसल्यास नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते याची तक्रार केल्यानंतर सरळ 132/11 केव्ही वर तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण दाखवून अधिकारी व कर्मचारी वेळ मारून नेत असल्याचे दिसून येत आहे.. त्यांची वेळेवर देखभाल दुरूस्ती करावी व जनतेला सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.
नागरिक हैराण
विद्युत पुरवठा खंडीत होणे नित्याची बाब चाळीसगाव तालुक्यासह शहरात अचानकपणे कुठल्याही भागात विद्युत पुरवठा खंडीत केला जातो विशेष म्हणजे भारनियमनाची कुटलीही कल्पना अथवा सूचना अद्याप दिलेली नसतांना तासनतास वीजपुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील काही भागात कमी प्रमाणात का होईना हा प्रकार सुरु असल्याने नागरिक मात्र कमालीची हैराण झाले आहेत ग्रामीण भागात तर परीस्थिती याहुन बिकट आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील गणेश कॉपलेक्स येथे गेल्या दोन दिवंसापासुन सकाळी 10 ते 2 या वेळेत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापार्यांचे मोठे प्रमाणावर व्यवसायिक नुकसान होत आहे विज वितरण कंपनीला फोन केल्यास लवकरच आपल्या कडे विज सुरळीत होईल असे सागण्यात येते मात्र चार चार तास विज गायब होते यामुळे व्यापारी वर्ग कमालीचा वैतागला आहे
– जगदीश पाटील, गणेश कॉम्प्लेक्स चाळीसगाव