नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना आज अखेर सुप्रीम कोर्टाने जमीन मंजूर केली आहे. त्यामुळे १०६ दिवसानंतर त्यांची तिहार तुरुंगातून सुटका होणार आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी पी.चिदंबरम यांना शिक्षा झाली होती. त्यांची तिहारच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावर त्यांना आज जामीन मंजूर झाली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देश सोडून न जाण्याच्या तसेच साक्षीदारांना भेटू नये अशा सूचना चिदंबरम यांना देण्यात आले आहे.