जळगाव: भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावासमोर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आलेला होता. या प्रकारानंतर प्रचंड संताप व्यक्त झाले. भाजपवर टीका देखील झाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर संताप व्यक्त करत, कारवाचा इशारा दिला होता. दरम्यान भाजपने चुक सुधारली असून नावासमोरील आक्षेपार्ह उल्लेख हटविला आहे. आता त्यांच्या नावासमोर रावेर (महाराष्ट्र) असा उल्लेख करण्यात आला आहे.
खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर ’होमोसेक्शुअल’ असे लिहिण्यात आले होते. याचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला चूक सुधारण्यास सांगितले होते.
Shocking to see such a derogatory description of Raksha Khadse, BJP MP from Maharastra on the official site of the BJP. Maha Govt. will not tolerate this disrespectful behaviour towards women. @BJP4India must take action against those responsible or @MahaCyber1 will step in. https://t.co/wKVilGB79I
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 27, 2021