डॉ. अविनाश ढाकणे यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
जळगाव । जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची बदलीच्या चर्चेला अखेर पुर्णविरामा मिळाला आहे. मे २०१७ मध्ये डॉ. अविनाश ढाकणे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली होती. गेल्या दोन वर्षाच्या काळात शहर विकासासाठी अनेक योजना राबविण्याचे काम केले.