अखेर जि. प. लघुसिंचन कार्यकारी अभियंता आर. के.नाईक कार्यमुक्त?

0

जळगाव: लघुसिंचनच्या प्रश्नांबाबत नेहमीच वादात असलेले जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना कार्यमुक्त करण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केली आहे. मात्र नाईक हे राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांच्या कार्यमुक्तीबाबत अंमलबजावणी करता येईल का? याबाबत संधीग्धता आहे. कारण राजपत्रित अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा अधिकार सचिव स्तरावरील आहे. सीईओ यांनी सभागृहात सदस्यांचा पवित्रा बघता कार्यमुक्त करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. मात्र तांत्रिकबाबींमुळे तातडीने उद्याच याची अंमलबजावणी होईल का?याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात नाईक यांच्या कार्यमुक्तीची मागणी केली होती. नाईक यांनी सिंचनच्या कामाबाबत आणि निधीबाबत सदस्यांची दिशाभूल केल्याचे आरोप करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत अनेकदा ठराव झाले मात्र त्यांची कार्यमुक्ती केली जात नव्हती.