अखेर दीपिका- रणवीरही अडकणार विवाहबंधनात

0

मुंबई: बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार आहे. चाहत्यांची सर्वात लाडकी जोडी म्हणजे दीपिका- रणवीर, नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा होत्या. अखेर दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.‘फिल्म फेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार हे जोडपं अखेर २० नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्याप्रमाणेच दीपिका आणि रणवीरही इटलीतचं डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे . या विवाहसोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले मोजकेच लोक उपस्थित राहतील अशी माहिती सुत्रानं दिली आहे. इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो, या नयनरम्य ठिकाणी हा विवावहसोहळा पार पडणार आहे.

त्यानंतर पुढच्या काही दिवसांत बॉलिवूड साठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन असेल असंही म्हटलं जात आहे.