जळगाव (प्रतिनिधी) – मनपाचे कर्मचारी अनील नाटेकर 29 फेब्रुवारीला 60व्यावर्षी निवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युऐटी, अर्जीत रजेची रक्कम, सहावा वेतन आयोगाचा फरक रक्कम महानगर पालिकेने दिला नव्हता. याविरोधात नाटेकर यांनी ऑक्टोबर महिन्यात महानगर पालिकेसमोर चार दिवस सत्याग्रह केला होता. यावेळी महापौर नितील लढ्ढा यांनी नाटेकर यांची भेट घेवून 15 दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवराम पाटील यांनी नाटेकरांना महापौरांवर विश्वास ठेवण्याचे सांगून उपोषणाची सांगता करण्यास सांगितले होते. शिवराम पाटील व अनील नाटेकर यांनी महापौरांच्या उपस्थितीत आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली असता आयुक्तांनी नाटेकरांचे थकीत पेमेंट प्राथमिता देऊन करावे, असा लिखीत शेरा मारून मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वांदे्र यांना दिला. मात्र, एक महिना उलटूनही थकीत पेमेंट देण्यात आले नाही.
अधिकारी, पदाधिकार्यांचे दुर्लेक्ष
महापौराचे आश्वासन व आयुक्तांचे लेखी आदेश देवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामागे आयुक्तांनी वांदे्र यांना तोंडी मनाई केल्याचे आढळून आले होते. या त्रासाला कंटाळून नाटेकरांनी पुन्हा एक डिसेंबरपासून महानगर पालिकेच्या इमारतीसमोर उपोषणास सुरूवात केली होती. त्यांना जळगाव जिल्हा जागृत जनमंचचा सक्रिय पाठिंबा मिळाला. तीन दिवस उपोषण सुरू असतांना मनपा अधिकारी, महापौर किंवा नगरसेवक यांनी याची दखल घेतली नाही. जळगांव मनपाच्या 52नगरसेवकांकडे प्रत्येकी 1कोटी 16लाख रुपये वसूली येणे बाकी आहे ,अशी यादी नाटेकरांनी डिजीटल बोर्डवर प्रदर्शित केल्याने नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. उपोषणाच्या तिसर्या दिवशी नाटेकरांचे पत्रक बनवण्यात आले. मीना नाटेकर व विजया शिवराम पाटील या महिलांना प्रेरणा घेवून शिवराम पाटील यांनी सरळ मनपा महासभेवर धावा बोलला. यावेळी त्यांनी महापौंर, आयुक्त, नगरसचिव यांना निवदेन देण्यात आले.
210 कर्मचार्यांना मिळणार लाभ
5 डिसेंबरला महापौर नितीन लढ्ढा व चीफ अकांऊंट ऑफिसर यांनी 210 कर्मचार्यांसाठी 1कोटी 5लाख बँकेत टाकले असल्याचे सांगितले. उद्या प्रत्येकाच्या खात्यात 50हजार रूपये वर्ग करण्याचे आदेश बँकेला देण्यात येतील असे आश्वासन दिले . नाटेकरांना उपोषण सोडण्याचे शिवराम पाटील यांना सुचवले असता नाटेकर यांनी मंगळवार 6 डिसेंबररोजी उपोषण सोडले दुपारी 4.40वाजता डॉ राधेशाम चौधरी,शिवराम पाटील,रमेश साळवे यांचे हस्ते लस्सी पिऊन नाटेकरांचे उपोषण सोडले.त्यावेळी शब्बीर अली,एन जे पाटील, गुरूनाथ सैंदाणे,विजया पाटील ,मीना नाटेकर,उमाकांत वाणी,सुरेश अंभोरे ,योगेश अहिरे हे हजर होते.