… अखेर नेरी येथील शाळेचे उघडले कुलूप

0

नगरदेवळा । नगरदेवळा येथून जवळच असलेल्या नेरी येथे सलग 2 दिवसंपासून सुरु असलेल्या पावसामुळे येथील राजमाजमाता जिजाऊ भोसले माध्यमिक विद्यालयातील वर्गात गळती लागल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेला कुलूप ठोकले होते.

सर्व पालक व ग्रामस्थांची समजूत काढून कुलूप उघडले व ताबडतोब काम सुरु करतो असे आश्वासन दिले, त्यावेळी ग्रामस्थांनी संस्थाचालकांसमोर समस्यांचा पाढा वाचला व त्यांनी दिलेले आश्वासन मान्य करत त्या वादावर पडदा पडला.