अखेर पंकजा मुंडेंच्या फेसबुकवर पेजवर ‘कमळ’ फुलले !

0

मुंबई : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या भाजप सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली आहे. चर्चेला कारण देखील तसे होते, पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपली भूमिका जाहीर करणार असे सांगितले आहे. त्यासाठी १२ रोजी मेळावा देखील घेतला आहे. त्यानंतर ट्वीटरवरील भाजपचा उल्लेख देखील काढून घेतला. त्यामुळे त्या पक्ष सोडणार हे निश्चित मानले जात होते. त्यासंदर्भात काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे ह्या भाजपा सोडण्याचा विचार देखील करू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर कमळ दिसले आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्याच्या बॅनरवर कमळाचे चिन्ह आहे. त्यामुळे त्या भाजपात सक्रीय आहे हे दिसून येते. यामुळे आत आत्या भाजपातच राहणार आहे हे देखील स्पष्ट होते.

तर पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले होते. भाजपाच्या आजच्या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुडेंनी उभारलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या, नेत्या आहेत. त्यामुळे, भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत त्या जाणार नसल्याचं पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.