अयोध्या: ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. थोड्याच वेळात दुपारी १२.४४ मिनिटांनी मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण भारतवासीय अनुभवणार आहे. अखेर प्रतीक्षा संपली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्यानगरीत दाखल झाले आहे. सकाळी दिल्लीहून मोदी त्यासाठी रवाना झाले होते. दिल्लीहून वायू दलाच्या विमानाने ते लखनौला आले होते. तेथून ते हेलिकॉप्टरने अयोध्यात दाखल झाले आहे. अयोध्यातील साकेत महाविद्यालयात मोदींचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
अयोध्यात आल्यानंतर प्रथम हनुमान गढीचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे अयोध्यात आल्यानंतर प्रथम मोदी हनुमान गढीचे दर्शन घेणार आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. २९ वर्षानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी राम जन्मभूमी परिसरात दाखल झाले आहे. १९९२ मध्ये त्यांनी रामाचे दर्शन घेतले होते, तेंव्हा त्यांनी ज्यावेळी राम मंदिर होईल तेंव्हाच रामाचे दर्शन घेईल अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर तब्बल २९ वर्षानंतर ते राम जन्मभूमीत दाखल झाले आहेत.
#WATCH live: PM Narendra Modi in Ayodhya for #RamTemple foundation stone laying ceremony. https://t.co/yo5LpodbSz
— ANI (@ANI) August 5, 2020
भूमिपुजानानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास वेशभूषा परिधान केला आहे. नेहमी कुर्ता-पायजामा परिधान करणाऱ्या मोदींनी राम जन्मभूमीच्या भूमिपुजानानिमित्त खास वेशभूषा केली आहे. कुर्ता-धोती मोदींनी परिधान केली आहे. पायात बूट घातले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचे फोटो शेअर करण्यात आले आहे.