एका वादग्रस्त विधानामुळे प्रियांका चर्चेत आली होती. केवळ चर्चेत नाही तर या वादग्रस्त विधानामुळे तिने लोकांचा संताप ओढवून घेतला होता. अलीकडेच प्रियांका टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. याठिकाणी प्रियांकाने प्रोड्यूस केलेल्या ‘पहुना’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. प्रियांकाच्या चित्रपटाला स्टँडिंग ओविएशन मिळाले. पण प्रियांकाची मुलाखत झाली अन् या मुलाखतीत प्रियांका भलतेच काही बोलून गेली. सिक्कीम हे भारताच्या ईशान्य भागातील एक लहानसे राज्य आहे. येथे कधीच चित्रपटसृष्टी पोहोचली नाही. या राज्यातील कुणीही कधीही चित्रपट बनवलेला नाही. ‘पहुना’ हा या राज्याशी संबंधित चित्रपट आहे. कारण सिक्कीम हे दहशतवादाने पोळलेले राज्य आहे, असे प्रियांका म्हणाली. मग काय तिच्या या विधानानंतर सोशल साइटवर लोकांनी प्रियांकाला चांगलेच घेरले.
लोकांनी तिच्या या विधानाची तीव्र शब्दांत निंदा केली. ‘मी प्रियांकाच्या या बोलण्याची निंदा करतो. सिक्कीम भारताचे सर्वाधिक शांतीप्रिय राज्य आहे. तुला लाज वाटायला हवी’, असे एका युजरने लिहिले. अनेक युझर्सनी प्रियांकाच्या तोकड्या माहितीवर बोट ठेवले.
Next Post