अखेर प्ले स्टोअरवरूनही Tik Tok रिमूव्ह !

0

नवी दिल्ली: सध्या भारत-चीन संबंध कमालीचे ताणले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आधारे भारत सरकारने सोमवारी टिकटॉकसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. भारत सरकारच्या या निर्णयानंतर १२ तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे.

“अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन टिकटॉक हटवण्यात आले आहे. भारत सरकारने काल ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली.

त्यामुळे आता युझर्सला टिकटॉक अ‍ॅप नव्याने डाउनलोड करता येणार नाहीत. टिकटॉक हे एक व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप असून जगभरामध्ये हे अ‍ॅप वापरणारे सर्वाधिक युझर्स भारतात आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने अनेक जण रातोरात सेलिब्रिटी झाल्याचीही उदाहरणे आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.