अखेर बळसाणे येथे एसटी गाड्यांना थांबा

0

बळसाणे। बळसाणे हे साक्री तालुक्यातील जैन धर्मियांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मात्र गावात साक्री व शिंदखेडा आगारातून येणार्‍या बस गाड्या स्थानकावर न थांबता थेट जून्या बसस्थानकावरून मार्गस्थ होत असत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असे. बळसाणे येथे एसटी गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीसाठी 28 जूलै रोजी धुळे विभागीय वाहतूक आधिकारी एम.सी.सपकाळ यांना शिवसेनेचे उपविभाग प्रमुख महावीर जैन यांनी निवेदन दिले. निवेदनानंतर महिना उलटूनही वाहतूक आधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते.

महिनाभरापासून होती मागणी
महावीर जैन यांनी 24 ऑगस्ट रोजी शिंदखेडा आगराची बस गावातील बसथांब्यावर आणण्याची विनवणी केली. परंतु शिंदखेडा आगाराचे चालकाने गावात बस येणार नसल्याचे सांगितले. शेवटी वाहतूक अधिकारी राजेंद्र देवरे यांनी महावीर जैन यांना पत्रक पाठविले होते. ते पत्रक चालकाला दाखविल्यानंतर अखेर बळसाणे येथे एसटी गाड्यांना थांबा मिळाला आहे. यासाठी गणेश जैन, छोटू गिरासे, युवराज खांडेकर, भैया मिस्तरी, अशोक गिरासे , हिम्मत गिरासे, हरिश सनेर, आबा धनगर, योगेश महाजन, राहूल महाले, वाशिम पठाण, सचिन पाटील यावेळी उपस्थित होते.