नंदुरबार । महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणारा बहुप्रतिक्षीत असलेल्या हातोडा पुलाचे लोकार्पण करतांना मनस्वी आनंद होत आहे. या पूलामुळे दळणवळण सुकर होऊन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी हा पूल नक्कीच उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. ते जिल्ह्यातील नंदुरबार सज्जीपूर तळोदा रस्त्यावर हातोडा गावाजवळ तापी नदीवरील हातोडा पूलाच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी बोलत होते.
नंदुरबार ते तळोदा अंतर 20 किलोमीटरने कमी
यावेळी खा.डॉ.हिना गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अपर जिल्हाधिकारी गोरक्षणाथ गाडीलकर, प्रातांधिकारी निमा अरोरा, तहसिलदार नितीन पाटील, विजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री.रावल म्हणाले, जिल्ह्याच्या विकासामध्ये दळणवळणाची भुमीका मोठी असते. दोन राज्यांना जोडणार्या या पूलामुळे नंदुरबार ते तळोदा अंतर 20 किलो मीटरने कमी होणार आहे. शालेय विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या हातोडा पुलाचे आज माझ्या हस्ते लोकार्पण होत असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मार्गदर्शनपन भाषणे झाली. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी हातोडा पुलाची सविस्तर माहिती देतांना म्हणाले, दोन राज्यांना जोडणारा हा पूल अत्यंत महत्वाचा मानला जातो 80 कोटीचा हा प्रकल्प असून याची लांबी 625 मिटर आहे. या पुलामुळे जिल्ह्याला जोडल्या जाणार्या सर्व गावांमधील 20 कि.मी. अंतर कमी झाल्यामुळे वेळेसह इंधनाची बचत होऊन मोठी सोय होणार असल्याचे सांगितले.