अकोला । अकोल्यातील बेपत्ता बिल्डर अमित वाघ आणि त्यांच्या कुटुंबाचा पत्ता अखेर लागला आहे. वाघ कुटुंब गोव्यात एका हॉटेलमध्ये सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून वाघ कुटुंब बेपत्ता होते. अमित वाघ हे सातार्याला सासुरवाडीला गेले होते. मात्र 13 जूनच्या रात्रीपासून कुटुंबीयांसह त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अमित वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि शाश्वत आणि स्पंदन या दोन मुलांचा सातारा पोलीस शोध घेत होत
व्यवसायातील स्पर्धा कारणीभूत
वाघ कुटुंब अकोल्यातील खडकी इथल्या संतोषनगर परिसरात राहते. वाघ यांचे अकोल्यातील गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. वाघ कुटुंब अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे बांधकाम व्यवसायातील स्पर्धा कारणीभूत असल्याची चर्चा होती. वाघ यांचा बांधकाम व्यवसाय हा भागीदारीमध्ये होता. मात्र ती भागीदारी अडचणीत आल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे बांधकाम व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न केले होत