मुंबई । तब्बल 18 वर्षांनी हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान विभक्त झाले आहेत. त्यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटासाठी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघे विभक्त झाले. अरबाज-मलायकाच्या वकील क्रांती साठे आणि अमृता साठे यांनी घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन नोव्हेंबर 2016 मध्ये अरबाज मलायका या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर अनेकदा दोघे आपापल्या वकिलांना भेटताना दिसले होते. नवीमुंबईत झालेल्या पॉप सिंगर जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला हे दोघे एकत्र दिसले होते.
मुलावर मलायकाचा हक्क
दोघांनी संमतीने घटस्फोटाचा अर्ज दिला होता. मलायका-अरबाजचा मुलगा अरहान हा मलायकाकडे राहणार आहे. याअगोदर मार्च 2016 साली या दोघांनी वेगळे होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघे आणखी काही दिवस विभक्त होणार नसल्याचे वृत्त आले होते. 1993 मध्ये मिस्टर कॉफी जाहिरातीच्या शुटींगसाठी अरबाज-मलायकाला साईन केले होते. ही एक बोल्ड जाहिरात होती.
मुलगा अरहान आता 14 वर्षांचा
यांनी 5 वर्षे एकमेकांना डेट केले आणि 1997 मध्ये लग्न केले. मात्र, पॉवर कपल या रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा हे दोघे दिसत नव्हते तेव्हापासून ते वेगळे होणार असल्याच्या चर्चा होत्या. मलायका-अरबाजच्या लग्नाला आता 18 वर्षे झाले आहे. त्यांचा मुलगा अरहान आता 14 वर्षांचा आहे.