लंडन :भारतातील सरकारी बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या याने दाखल केलेली याचिका इंग्लंडमधील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.