जळगाव । बेंडाळे चौकात 18 मे रोजी रात्री दोन मोटारसायकलस्वार तरुणांनी एका पादचार्याला बांबूने मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाला सहा दिवस उलटूनही मृताची ओळख अजूनही पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तर या प्रकरणात संशयितानी ज्या बांबूने मारहाण केली. तो पोलिसांनी जप्त केला आहे. तुकारामवाडीतील संदीप वाणी (बोरसे, वय 22) व एक अल्पवयीन मुलगा हे दोघे गुरूवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत जात असताना बेंडाळे चौकात एका पादचार्याला त्यांच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून त्यांच्यात वाद होवून दोघांनी यात तरूणाला बेदम मारहाण केली. मात्र दोघांनी त्याला बांबूने मारहाण केली होती. त्यात पादचारी जखमी अवस्थेत तो 19 मे रोजी सकाळपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या वाचनालयाच्या भिंतीजवळ पडून होता.
त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी संदीप वाणी आणि एका अल्पवयीन संशयिताला अटक केली होती. घटनेला सहा दिवस उलटूनही मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दोन्ही संशयितानी मारहाण केल्यानंतर बांबू नागोरी चहाजवळ टाकल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपासले. मात्र बांबू सापडला नव्हता. मृत तरूण बेंडाळे चौकातील ज्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत पळत गेला होता. त्या इमारतीत पोलिसांनी तपासले असता. त्या ठिकाणी रक्ताने माखलेला बांबू सापडला आहे. मृताचा व्हीसेरा, कपडे, संशयितांचे कपडे पोलिसांनी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहेत.
खुनातील संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी
तुकारामवाडीतील संदीप वाणी व एक अल्पवयीन मुलाने 18 मे रोजी बेंडाळे चौकात एका पादचार्याला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी संदीप वाणी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. संदीप याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्याला न्यायाधीश कस्तुरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.