सिंधुदुर्गः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र मुहूर्त ठरत नव्हता, दरम्यान आता 2 ऑक्टोबरला राणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिला आहे.
राणे भाजपात गेल्यास शिवसेनेची नाराजी ओढवू शकते, यामुळेच भाजपात राणेंचा प्रवेश रखडत होता. मात्र आता राणेंचा भाजप प्रवेश ठरला आहे. राणेंच्या प्रवेशामुळे स्वाभिमान पक्ष देखील भाजपात विलीन होणार आहे. राणे हे सध्या भाजपात नसले तरी ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झालेले आहे.