अखेर रस्ता झाला खड्डेमुक्त

0

जनशक्तिच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला आली जाग
चिंबळी : पुणे नाशिक राष्ट्रीयमहामार्गावरून आळंदीकडे जाणार्‍या चिंबळीफाटा ते चिंबळीगांव रत्स्यावर जड मालवाहू गाड्यांची वाहतुक व साडपांण्यामूळे एका चढणी वरती डाबंरीकरण व खडी उखडून मोठ मोठे खड्डे पडले होते.त्यामुळे पायी चालणे व दुचाकी मोटरसायकल चालविणे मोठे कसरतीचे झाले होते. या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी म्हणून जनशक्तीने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केल्याने अखेर चाकण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी केली आहे.

ग्रामपंचायतीला दिले पत्र
परंतु रहदारीचे साडपांणी रत्स्यावर येत असल्याने डांबर राहत नसल्यामुळे रत्स्यावर पुन्हा खड्डे पडण्याचा धोका असल्याचे शाखा अभियंता संतोष पवार यांनी सागिंतले. या सदंर्भात सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे असे ग्रामपंचायतीला सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिले असल्याचे पवार यांनी सागिंतले