शहादा । तालुक्यातील वडछील गावातील दारुविक्री बंद करावी असा ठराव महिलाच्या विशेष ग्राम सभेत पारीत करण्यात आला. याबाबत तहसिलदार मनोज खैरनार यांना ठरावाचा नक्कलसह निवेदन 23 जुन रोजी देण्यात आले होते. याची दखल घेत तहसीलदार खैरनार यांनी शहादा पो. स्टेचे पोलिस निरिक्षकाना वडछील गावची दारुबंदी करण्याचे आदेश दिले. वडछील गावात अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर दारु विक्री होत असुन या दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याचा मार्गावर असल्याने अखेर वडछीलचा रण रागिणींनी एकत्र येत ग्रामपंचायतीस महिलांची विशेष सभा घेण्यास भाग पाडीत 23 जुन चा विशेष सभेत दारु बंदी चा ठराव एकमुखी पारीत केला. सदर ठरावाचा नक्कल तहसीलदार खैरनार यांना देण्यात आली. या ठरावाची दखल घेत तहसीलदार खैरनार यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना लेखी आदेश दिला. या आदेशात वडछील गावात पुन्हा दारु विक्री सुरु होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.