बंगळुरु : बंगळुरु येथील सभेत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी सभेत आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींवर भारी आहोत असं म्हणत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं.
वारिस पठाण यांच्याविरोधात कलम ११७, १५३ दंगलीसाठी भडकावना आणि कलम १५३ ए दोन समाजात तेढ निर्माण करणे अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुलबर्गा येथे १९ फेब्रुवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जाहीर सभचे आयोजन करण्यात आले होते. त्या रॅलीत वारीस पठाण यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या विधानानंतर देशभरात वादाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जात आहे. पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांना पुढील आदेशापर्यंत माध्यमांशी न बोलण्यास बजावलं आहे.
कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात वादग्रस्त विधानं केलं. “आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, असं चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी केले होते.