चाळीसगाव – शहरातील सिग्नल चौकामध्ये उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळासाठी पालिकेकडे सहा निविदा आल्या होत्या त्यापैकी पुतळा निवड समितीने औरंगाबाद येथील सुनील देवरे यांची निविदा कायम करण्यात आली असून काल सायंकाळी त्यांना पालिकेत मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या कक्षात कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अशालाता चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, विश्वास चव्हाण, नानाभाऊ कुमावत, विजया पवार, विजया भिकन पवार, झेलाबाई पाटील, वस्त लाबई महाले, अरुण अहिरे, चिराग शेख, सोमसिंग राजपूत, अभियंता विजय पाटील, भरत गोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी अनिकेत नोरकर म्हणाले की, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती निवड समिती संकल्पनेप्रमाणे समितीच्या सदस्यांनी धुळे औरंगाबाद खुलताबाद व इतर शिल्पकार यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती आज अखेर औरंगाबाद येथील सुनील देवरे असोसिएशन यांनी दिलेले संकल्पनेच्या पुतळ्याला मंजुरी देण्यात आली आहे. 53 लाख 97 हजार रुपये किमतीचा हा ब्राँझचा पुतळा तीन महिन्यांमध्ये ठेकेदाराने बनवून द्यायचा आहे. अशी माहिती त्यांनी दिली.