अखेर संजय राऊतांनी इंदिरा गांधींबद्दलचे वक्तव्य घेतले मागे !

0

मुंबई : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन कॉंग्रेसमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी पसरली होती. अखेर संजय राऊत यांनी त्यांचे हे विधान मागे घेतले आहे. इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्याने कोणी दुखावले गेले असेल, तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे सांगून संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे.

जेव्हा इंदिरा गांधींविषयी कोणी टीका टिपणी करत असे, तेव्हा काँग्रेसमधील माझे मित्र गप्प बसायचे, पण मी त्यांची बाजू उचलून धरायचो. परंतु माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेला ठेच पोहचली, असे कोणाला वाटत असेल, त्या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, असे संजय राऊत म्हणाले. काँग्रेस नेते संजय निरुपम आणि मिलिंद देवरा या दोघांनीही संजय राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केली होती.

माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या विधानावरून कॉंग्रेसला लक्ष केले होते. काही प्रश्न देखील फडणवीस यांनी उपस्थित केले आहे.