जयपूर: कॉंग्रेस नेते राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारत राजस्थान सरकार पडण्याबाबत हालचाली केल्या होत्या. मात्र ते यात यशस्वी झाले नाही. कॉंग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. राज्यस्थानच्या संपूर्ण राजकीय घडामोडीत त्यांचे म्हणणे समोर आलेले नाही. मात्र त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी प्रथमच ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।’ असे एका ओळीचे ट्वीट सचिन पायलट यांनी केले आहे.
सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।
— Sachin Pilot (@SachinPilot) July 14, 2020
त्यांनी त्यांच्या ट्वीटर खात्यावरील बायोग्राफीत देखील बदल केली असून उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख काढून टाकला आहे. आता त्यांच्या राजकीय भुमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ते भाजपात जाणार की नवीन पक्ष स्थापन करणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.