जळगाव – देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या तथा काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी कोरोना नियमांना धाब्यावर बसवत पक्षीय बैठक झाली. पोलीस प्रशासनाने अखेर या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वृत्त असे की, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांचा शनिवारी जळगाववात दौरा झाला. अजिंठा विश्रामगृहात पक्षाची बैठक घेण्यात आली. सध्या जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असतांनाही या बैठकीला नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. यावर जनशक्तीने टीका देखील केली होती. सर्वसामान्य नागरिक आणि राजकारणी यांना वेगळे नियम आहेत का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याची दखल घेत आज नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांविरूध्द कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातकाँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे.