अखेर सहा दिवसानंतर आमरण उपोषण मागे

0

उल्हासनगर : गेल्या 6 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिका मुख्यालयासमोरच डॉ. सुरेश गवई यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मनपा प्रशासनांनी त्यांच्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने गवई यांनी उपोषण अखेर शनिवारी मागे घेतले.

उल्हासनगर मनपाच्या हद्दीतील सर्व डांबरीकरण रस्त्यांचे काँक्रेटीकरण करण्यात यावे शहरातील मुख्यठिकाणी चौकामध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, शहरातील सर्व करदात्यांना आरोमुक्त(शुध्द पाणी) देण्यात यावे, जातीय मानसीकता असलेल्या उच्च पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरीकांसाठी हानीकारक असलेले कॅम्प नं. 5 येथील डंम्पींग ग्राउंड बंद करण्यात यावे, पवई चौकात झालेल्या दुर्घटनेत मयत जया झरेकर या महिलेल्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, रोगराईवर मात करण्यासाठी औषध फवारणी गटारे व नाल्यांची सफाई करण्यात यावी, तसेच जनसंपर्क अधिकारी व करनिर्धारक युवराज भदाणे यांना ताबडतोब पदावरून निलंबीत करावे अशा विविध मागणींसाठी गवई यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.