अखेर सारा-कार्तिकची झाली भेट; ‘ह्या’ अभिनेत्याने करून दिली ओळख!

0

मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अनेक सिलेब्रिटी येत असतात आणि इथे ते त्यांच्या जीवनातील अनेक सिक्रेट शेअर करतात. काही दिवसांपूर्वी करण च्या या शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलली होती की मी अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करु इच्छित आहे.

अखेर रणवीर सिंगने त्यांची भेट करुन दिली. साराच्या या इच्छेवर कार्तिकने हसून प्रतिक्रिया दिली होती. तिने नेहमीच कार्तिकला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका कार्यक्रमादरम्यान, कार्तिक आणि साराची भेट झाली. यावेळी कार्तिक रणवीरला भेटण्यास आला होता. मात्र, रणवीरने वेळ न घालवता साराची भेट कार्तिकशी करुन दिली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.