अखेर सीएमव्हीं रोगग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार भरपाई आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सी एम व्ही या रोगामुळे अक्षरशः केळी उपटून फेकण्याची वेळ मागील वर्षी आलेले होते त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागील वर्षी 20 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेतच केळी उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. विविध अशा प्रक्रिया पार पडल्यानंतर केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात येईल अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी लोकमतला दिली. 2021/ 22 या आर्थिक वर्षात केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. सी एम व्ही या रोगामुळे अक्षरशा शेतकरी त्रस्त झालेले होते. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे उत्पादन झाले नाही. लहान असतानाच झाड हे कोमेजून गेले त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः केळी उपटून फेकावी लागलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले गेलेले होते. मागील वर्षी दि.20 सप्टेंबर 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आले असता, येथे झालेल्या जाहीर सभेत मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सी एम व्ह या केळीवर येणाऱ्या रोगा संदर्भात नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मागणी केली होती. तसेच हिवाळी अधिवेशन, डिसेंबर 2022 मध्ये देखील या मागणी संदर्भात माहितीचा मुद्दा मांडून नुकसान भरपाई देणार की नाही असा खडा सवाल सरकारला विचारला होता. तसेच सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता, या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी लवकरच सी एम वी रोगाची नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले असल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच सी एम वि रोगाची नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.