अखेर १९ दिवसानंतर हार्दिक पटेल यांनी उपोषण सोडले

0

गांधीनगर-गुजरातमधील पाटीदार समाजातील युवानेते हार्दिक पटेल यांनी गेल्या १९ दिवसांपासून पाटीदार आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले होते. अखेर आज त्यांनी उपोषण सोडले आहे. उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येत होती मात्र ते मागणीवर ठाम होते. अखेर आज त्यांनी उपोषण मागे घेतले.

उपोषणादरम्यान त्यांना विविध पक्षांचे नेते भेटून गेले व पाठींबा देखील दिला.