अखेर 3 दिवसानंतर गणेश कॉम्प्लेक्स पूर्ववत सुरू

0

चाळीसगाव। शहरातील गणेश कॉम्प्लेक्स मध्ये व्यापार्‍यांनी दि 17 रोजी तालुक्यातील करगाव येथील सी आर पी एफ च्या जवानाला गंभीर मारहाण केल्याने तेव्हा पासून त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन तब्बल 3 दिवस गणेश कॉम्प्लेक्स बंद होते आज 20 रोजी अखेर पोलीस बंदोबस्तात हे कॉम्प्लेक्स पूर्ववत सुरु झाले असून व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जवानाच्या डोक्याला लोखंडी रॉडमुळे दुखापत
शुक्रवार 17 मार्च रोजी करगाव ता. चाळीसगाव येथील सीआरपीएफचा जवान देवेंद्रसिंग राजपूत हा सॅमसंग गॅलरी केअर सेंटरमध्ये मोबाईल दुरुस्ती साठी गेला होता. त्यावेळी केअर सेंटरचा मालक व इतर 12 ते 13 मोबाईल दुकानदारांनी त्यांना शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली तर तसेच त्यांच्या अंगावर लोखंडी खुर्ची मारून व डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले होते.

व्यापार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण
घटना घडल्यापासून त्या ठिकाणी तणाव वाढू नये म्हणून कॉम्प्लेक्स व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे त्याठिकाणी गणेश कॉम्प्लेक्स ला तणावाचे वातावरण होते त्या नंतर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल झाला. महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने आरोपीना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती. दरम्यान सोमवारी 20 मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात हे कॉम्प्लेक्स पोलीस बंदोबस्तात पूर्ववत झाले.