वाल्हेकरवाडी (प्रतिनिधी) – येथे ऊसाच्या शेतात काल दुपारी आग लागली होती. मात्र ही आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दालवरच नागरिकांनी दगड फेक केली गेली. ही घटना काल दुपारी घडली. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही आग लागली होती. वर्दी मिळताच प्राधिकऱण येथील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आग भडकत असल्याने गाडीतील पाणी संपले. यावेळी गाड्या पाणी भरण्यासाठी म्हणून मागे फिरत असताना संतप्त नागरिकांनी अग्निशामक दलाच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये गाडीची एक काच फूटली.
ऊसामुळे आग भडकली!
यावेळी स्थानिक नागरिकांनी मात्र वेळीच वर्दी देऊनही पुरेसे पाणी व यंत्रणा का आली नाही म्हणून संताप व्यक्त केला. तर अग्निशामक दलाने त्यांची बाजू मांडतांना सांगितले की, दोन गाड्या घटनास्थळी होत्या. मात्र उस असल्याने आग भडकत होती. पाणी संपले होते. अधिक गाड्या व यंत्रणा मागवली होती. नागरिक चिडले असल्यामुळे त्यांनी परिस्थीती समजून घेतली नाही. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल निगडी पोलीस ठाण्यात अग्निशामक दलातर्फे तक्रार कऱण्यात आली आहे.