अग्निशामकचा सब ऑफिसर एसीबीच्या जाळ्यात

0

ना हरकत दाखला देण्यासाठी मागितली लाच

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या सब ऑफिसरला 15 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबीने) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अग्निशामक विभागाच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील कार्यालयात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आली. उदय माधवराव वानखेडे असे पकडेल्या सब ऑफिसरचे नाव आहे.

वानखेडे हे पिंपरी महापालिकेच्या अग्निशाक विभागात सब ऑफिसर या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. ना हरकत दाखला देण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडे 15 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत या व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसबीने शनिवारी वानखेडे यांना तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.