अग्निशामक कर्मचार्‍यांसोबत रक्षाबंधन

0

हडपसर । सावली फाउंडेशन आणि ससाणेनगर येथील महिलांच्या वतीने हडपसर औद्योगिक वसाहतमधील अग्निशामक दलाच्या जवानांसोबत राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीच्यावेळी भयानक संकटापासून वाचविण्यास सदैव तत्पर असलेल्या या अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना यावेळी करण्यात आली. उपस्थित जवानांनी सर्व भगिनींचे आभार मानले. अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी चव्हाण, दत्तात्रय चौधरी, कैलास टकले, सखाराम पवार, मंगेश टकले, चंद्रकांत नवले, नारायण जगताप आणि विलास दडंस यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सावली फाउंडेशनच्या संचालिका पद्मा योगेश ससाणे, रोहिणी सावंत, नमिता दास, रुपाली कांबळे, सुनिता टेकवडे, वृषाली कुदळे यांनी केले.