सहकारनगर । गणपती विसर्जनाच्या दिवशी स्व:चा जीव धोक्यात घालून एका बुडणार्या व्यक्तीचा प्राण वाचविल्याबद्दल अग्निशामक दलातील फायरमन दादासाहेब यादव यांचा सत्कार करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. भोई प्रतिष्ठानच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम, सुनील शिरगावकर आदी उपस्थित होते.