अग्नी-५ लष्कराची ताकद वाढवणार

0

नवी दिल्ली : भारतीय लष्कराची ताकद अग्नी-५ मुळे वाढणार आहे. या नवा क्षेपणास्त्रामुळे भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि उत्तर कोरियाच्या पंक्तीत जाऊन पोहोचला आहे. जबरदस्त मारा करण्याची ताकद असलेल्या अग्नी-५च्या टप्प्यात चीन आला आहे. त्यामुळे चीनच्या महत्वाच्या शहरांवर आपण सहज मारा करु शकतो.

अग्नी-५ या आंतरखडीय प्रक्षेपक क्षेपणास्त्र (इंटरकॉन्टीनेंटल बॅलेस्टीक मिसाईल) प्रणालीचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश केला जाणार आहे. यामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि शान आणखी वाढणार आहे. नेहमी खुरापती काढणाऱ्या चीनलाही जबर बसविणे यामुळे शक्य झालेय. कारण अग्नी-५ मुळे भारताच्या टप्प्यात चीन आला आहे.

अग्नी-५ ची मारक क्षमता तब्बल ५ हजार किमी आहे. अग्नी-५ मध्ये अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमतासुद्धा आहे. लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यापूर्वी विविध पातळ्यांवर चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता चीनसुद्धा आपल्या टप्प्यात आला आहे. चीनमधील बिजींग, शांघाई, ग्वांगझोऊ व थायलंडवर सुद्धा अग्नी-५ सहजपणे मारा करु शकते, या अधिकाऱ्यांनी सांगितले.