संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात
नवी दिल्ली : भारताकडूनच लवकरच अग्नी-5चे अनावरण केले जणार आहे. हे भारताचे पहिलेच आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असेल. अग्नी-5 ची दुसरी चाचणी लवकरच होणार असून चाचणीची तयारी पूर्ण झाली आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 18 जानेवारीला झाली होती. एप्रिल 2012 नंतर यामध्ये चारवेळा सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली. या क्षेपणास्त्राचा समावेश स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडच्या (एसएफसी) अंतर्गत करण्यात येईल. 5 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणार्या अग्नी-5 ची यंत्रणा आणि उपयंत्रणा एसएफसीकडे सोपवण्यात आल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण चीन या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असणार आहे. यासोबतच युरोप आणि आफ्रिका खंडातील काही भागदेखील या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असतील.
Prev Post
Next Post