अग्रलेख लिहिण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा – असदुद्दीन ओवेसी

0

दिल्ली : अग्रलेख लिहण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं. शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतं आणि भीती लपवण्यासाठी त्यांनी संपादकीय लिहिण्याचा  हा नवा मार्ग शोधला आहे. असा टोला असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनाला लगावला आहे.

‘शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरते आणि आपली भीती लपवण्यासाठी त्यांनी फक्त संपादकीय लिहिण्याची ही नवी निती अवलंबली आहे. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी संपादकीय लिहिणं बंद करावं आणि मोदी, फडणवीस सरकारमधून बाहेर पडावं’, असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. मी तुम्हाला माझे पूर्वज भारतीय होते हे सिद्ध करुन दाखवू शकतो असंही ते म्हणाले आहेत.